कुरियर म्हणजे काय | What is courier in marathi
Courier information in marathi : कुरियर हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. परंतु समाजामध्ये असे अनेक लोक आहेत त्यांना कुरियर बद्दल जास्त माहिती नाही. तुम्हाला माहीत असेल की भारतामध्ये फ्लिपकार्ट ॲमेझॉन यासारख्या कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याच कुरियर चा वापर करतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण कुरियर विषयी माहिती (Courier information in marathi) जाणून घेणार आहोत.
कुरियर म्हणजे काय (What is courier in marathi)
कुरियर म्हणजेच टपाल सेवा. कुरियर की एक अशी सेवा आहे जी कोणालाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही वस्तू पाठवण्याची अनुमती देते. कुरिअर पाठविण्यासाठी आपल्याला अनेक ऑफिस भेटतात. तेथे जाऊन आपण याबद्दल अधिक चौकशी करू शकतो. कुरियर की सेवा मोठ्या प्रमाणात माल आणि महत्त्वाची कागदपत्रे खूप वेगाने पाठवण्याची सुविधा देते. कुरियर ही सेवा लोकल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा केली जाते.- भारतातील राज्यांची माहिती | Indian states information in marathi
- जैवविविधता म्हणजे काय (biodiversity meaning in marathi)
- कॉपीराइट म्हणजे काय (Copyright information in marathi)
- आदिवासी म्हणजे काय (Aadivasi Mhanje kay)
कुरिअर सर्व्हिस विकसित होण्यामध्ये तिचा वेग आणि तिची सुरक्षा महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु यासाठी आपल्याला कंपनीमध्ये सामान्य डाकाच्या तुलनेने थोडी रक्कम जास्त द्यावी लागते. परंतु कुरिअर कंपन्या वजनदार सामान खूप वेगाने पोहोचवतात. जेव्हापासून ऑनलाइन खरेदीला सुरुवात झाली तेव्हापासून कुरियर सेवेची लोकप्रियता वाढत गेली. कारण ऑनलाईन विक्रेत्यांना आपल्या वस्तू ची ऑर्डर आणि वस्तू वेळेत पोहोचवण्यासाठी कुरियर सेवा खूप उपयुक्त ठरते. कुरिअर विषयी माहिती (Courier information in marathi) आता आपण जाणून घेतली.
कुरियर कसे पाठवले जाते (How to send a courier in Marathi)
- कुरियर पाठवणे खूप सोपे असते. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल टायटी आता आपण जाणून घेऊ.
- सर्वात पहिल्यांदा जे सामान आपल्याला कुरियर साठी पाठवायचे आहे ते एका बॉक्समध्ये पॅक करून घ्यावे. जर काही लेटर वगैरे टाकायचे असेल तर त्या बॉक्स मध्ये टाकावे.
- आता आपल्याला जो बॉक्स किंवा लिफाफा कुरियर ने पाठवायचा आहे, त्यावर ज्याला आपल्याला कुरियर पाठवायचे आहे त्याचा पत्ता टाकावा. त्याचा पत्ता टाकताना त्याचे नाव, त्याच्या घराचा पूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आणि मोबाईल नंबर सुद्धा टाकावा.
- लिफाफा च्या खालच्या कोपऱ्यामध्ये आपण आपले नाव, आपला पत्ता आणि मोबाईल नंबर टाकावा.
- आता आपल्याला जे कुरियर पाठवायचे आहे ते घेऊन शहरातील कोणत्याही कुरियर ऑफिस मध्ये जावे लागेल. जेव्हा आपण आपले कुरियर पाठवण्यासाठी ऑफिस मध्ये देऊ, तेव्हा ते आपल्याला एक Docket Number देतील. या Docket नंबर च्या आधारावर आपण आपले कुरियर कोठे गेले आहे हे पाहू शकतो.
- हा Docket Number खूप महत्त्वाचा असतो, कारण जर आपले कुरियर त्या पत्त्यावर पोहोचले नाही तर, आपण आपला Docket Number दाखवून त्या ऑफिस मध्ये याविषयी माहिती घेऊ शकतो. त्यामुळे हा नंबर जपून ठेवावा.
भारतामध्ये कुरियर सर्विस देणाऱ्या कंपन्या (Courier services companies in India)
- DHL
- FEDEX
- BLUE DART EXPRESS
- DCART
- DTDC
- VRL COURIER SERVICE
- ECOM EXPRESS PVT LTD
पोस्ट ऑफिस मधून कुरियर कसे पाठवावे?
- दीडशेपेक्षा अधिक वर्षापासून पोस्ट ऑफिस आपल्या सेवेसाठी सदैव तयार असते. उदाहरणासाठी समजा तुम्हाला एक पत्र कुरियर म्हणून पाठवायचे आहे, त्यासाठी पुढील पद्धती आहेत :
- सर्वात पहिल्यांदा आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल.
- पोस्ट ऑफिस मधून आपल्याला एक लिफाफा खरेदी करावा लागेल, आणि आपल्याला जे सामान कुरियरने पाठवायचे आहे ते त्या लिफाफा मध्ये टाकावे. आणि तो लिफाफा चिकटवावा. आणि त्याच्या वरती स्पीड पोस्ट असे लिहावे.
- लिफाफा त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला ज्या व्यक्तीला ते कुरियर पाठवायचे आहे त्या व्यक्तीचे नाव, पत्ता आणि फोन नंबर लिहावा.
- लिफाफा च्या उजव्या बाजूला आपण आपली माहिती नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहावा.
- हे सर्व झाल्यानंतर लिफाफा पोस्ट ऑफिस मधील स्पीड पोस्ट च्या काऊंटरवर जमा करावा. त्या लिफाफ्या चे वजन आणि आपल्याला ज्या ठिकाणी ते कुरिअर पोहोचवायचे आहे त्याचे अंतर पाहून ते आपल्याला किती पैसे लागतील हे सांगतील.
- पैसे काउंटरवर जमा केल्यानंतर त्यावर ती शिपिंग चे लेबल प्रिंट करून लावले जाते.
- त्यानंतर त्याची आपल्याला एक पावती दिली जाते यावरती ट्रेकिंग नंबर दिलेला असतो. पोस्ट ऑफिस च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन आपण हा नंबर टाकून आपले कुरियर कोठे पोहोचले आहे हे पाहू शकतो.
विदेशामध्ये कुरियर पाठवणाऱ्या कंपन्या (International courier companies in India)
- FedEx
- DHL
- Aramex
- India Post
- DTDC
- ECOM EXPRESS
- Delhivery
- TNT India
- Bombino Express
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा